इम्यूनिटी वाढते
श्रीखंड खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यात आढळणारे गुड बॅक्टेरिया इम्यून सिस्टमला चांगलं ठेवण्यात मदत करतात. सोबतच यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतं, जे हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचं असतं.
वजन कमी करण्यात फायद्याचं
दह्यात अधिक प्रमाणात कॅल्शियम आढळतं.हे घटकामुळे शरीर फुलतं नाही आणि वजनावर नियंत्रण राहतं. ड्राय फ्रूट्समुळे प्रोटीन मिळतं जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नसल्यामुळे कमी प्रमाणात आहार घेतला जातो.
मूड-स्विंग्स आणि ताण कमी करतं
दही खाण्याचा थेट संबंध मेंदूशी आहे. दही खाणार्या ताण कमी जाणवतो. श्रीखंडात ते सर्व पदार्थ असतात ज्याने आपलं मूड स्विंग होत असल्यास किंवा गोड खाण्याची इच्छश होत असल्यास फायद्याचं ठरतं. जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर दररोज याचे सेवन करणे फायद्याचं ठरेल. हे शरीराला हायड्रेटेड करुन नवीन ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतं.

No comments:
Post a Comment