अभिषेक बच्चनचा 'बिग बुल' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. या सिनेमाची सोशल मीडियावर कायमच चर्चा होती हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे चाहते सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. डिस्ने हॉटस्टारवर रिलीज झालेला 'बिग बुल' हा हर्षद मेहता यांनी 1992 च्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारित आहे. सोशल मीडियावरील बरेच चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत, त्याचबरोबर या सिनेमामध्ये अभिषेकच्या व्यक्तिरेखेचं आतापर्यंत सर्वोत्कृष्ट पात्र असल्याचं वर्णन करत आहेत.
#TheBigBullWatchParty #thebigbull
- Lost In Time (@Uncertainsoulof) April 8, 2021
watching Big bull @juniorbachchan is fantastic as always pic.twitter.com/D0m7L522lI
'स्कॅम १९९२' या वेबसिरीजची या सिनेमाबरोबर मोठ्या प्रमाणात तुलना केली जात आहे.
मात्र बर्याच लोकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर काहीजण म्हणतात की, या सिनेमाच्या माध्यमातून अभिषेकने आपला चित्रपट गुरुची आठवण करून दिली आहे.
१९९२मध्ये भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर बिग बुलची कहाणी आहे. हर्षदने बर्याच आर्थिक गुन्हे केले आहेत, ज्यामुळे त्याला अटकही झाली. हा चित्रपट अजय देवगन आणि आनंद पंडित निर्मित आहे.
बिग बुल स्टार अभिषेक बच्चन याच्यासह इलियाना डिक्रूझ आणि निकिता दत्ता या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, जो खूप सोशल मीडियावर खूप गाजला होता.
वडिलांच्या चित्रपटाला टक्कर
बिग बुल हा सिनेमा वडील अमिताभ बच्चन यांच्या चेहरे चित्रपटाला टक्कर देणारा आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीचा चित्रपट चेहरा 9 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार होता. द बिग बुल ओटीटीवर रिलीज झाला आहे, परंतु तरीही या दोन्ही चित्रपटांत आपसात टक्कर झाली असती. कोविडच्या वाढत्या घटनांमुळे, चेहरा या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment