आता ENTERTAINMENT NONSTOP.. झी मराठी आणि स्टार प्रवाह वरील मालिकांचे शूटिंग चालूच राहणार...
महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या दुसर्या लाटेमध्ये झपाट्याने कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने 'ब्रेक द चेन' (Break The Chain) अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदीचे नियम दिले आहेत. स्ध्या 1 मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यामुळे मुंबई नगरीतील सारी चित्रीकरणं बंद पडली आहेत. यामध्ये मराठी मालिकांचाही समावेश आहे. ऐरवी ठाणे, मढ, फिल्मसिटी परिसरात मालिकांचे शूटिंग सुरू असायचे पण आता कडक निर्बंधांमुळे अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्यांनी त्यांची पुढील शूटिंग्स ही गोवा (Goa), गुजरात मधील राजकोट (Rajkot), सिल्वासा (Silvasa) येथे हलवून कामाला सुरूवात केली आहे.सध्या सोशल मीडियांत अनेक कलाकारांनी त्यांच्या ट्रॅव्हल डायरीजचे फोटो टाकून चाहत्यांना याची माहिती दिली आहे.
झी मराठी वरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या स्वीटू-ओम, चिन्या या त्रिकूटाने काल 'ट्रॅव्हल झोन ऑन' असं म्हणत एक फोटो पोस्ट करून शूटिंगला पुन्हा सुरूवात होत असल्याचं सांगितलं आहे. तर अगं बाई सुनबाई ची टीम देखील गोव्यात असल्याचं या मालिकेतील मॅडी अर्थात भक्ती रत्नपारखीने तिच्या इंस्टा स्टोरी मध्ये सांगितलं आहेदरम्यान झी मराठी सोबतच स्टार प्रवाह वरील मालिका देखील गोवा आणि सिल्वासा मध्ये पुढील शूटिंगसाठी दाखल झाले आहेत. लोकसत्ताच्या वृत्तानुसार, 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'रंग माझा वेगळा' या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे तर 'सांग तू आहेस का','मुलगी झाली हो','सहकुटुंब सहपरिवार','स्वाभिमान','आई कुठे काय करते' या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण सिल्वासामध्ये करणार आहेत.
सध्या टेलिव्हिजन विश्वाला कोरोना संकटासोबतच प्रेक्षकांना त्यांच्याकडे खिळवून ठेवण्यामध्ये आयपीएलचे देखील आव्हान आहे. त्यामुळे मराठी मालिकांनी पुढील चित्रीकरणासाठी महाराष्ट्राला बाय बाय म्हणत तात्पुरता बाहेरचा मार्ग निवडला आहे. सध्या काही मालिकांचे जुनेच एपिसोड पुन्हा दाखवले जात आहेत..

No comments:
Post a Comment