Maharashtra Corona Cases : काहीसा दिलासा! आज 52312 रुग्णांना डिस्चार्ज तर 51751 कोरोनाबाधितांची वाढ - स्पॉटलाईट न्युज

Breaking

Monday, April 12, 2021

Maharashtra Corona Cases : काहीसा दिलासा! आज 52312 रुग्णांना डिस्चार्ज तर 51751 कोरोनाबाधितांची वाढ

Maharashtra Corona Cases : राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाचं म्हणजे आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात आज 51751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 564746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आज राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे. पुण्यात आज दिवसभरात 9621 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 86 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 




No comments:

Post a Comment

WEBSITE EDITED AND DESIGNED BY RAM DESHPANDE