पुरावरची कविता🥺🥺 - स्पॉटलाईट न्युज

Breaking

Sunday, July 25, 2021

पुरावरची कविता🥺🥺

 पुरावरची कविता🥺🥺



रात्र पावसाची स्मरते कधी कधी....

रात्र पावसाची स्मरते कधी कधी,

जेव्हा रौद्ररूप धारण केले होतेस ग तू नदी,

का रे बरसलास एवढा पावसा तू ,

सारा गाव उध्वस्त केलास तू.


दुष्काळान होरपळत होत माझं गाव,

आणि अचानक पावसा तू बरसून दिलास मोठा घाव,

मुसळधार कोसळून आयुष्य बरबाद केलेस तू,

उभ पीक शेतात आडव केलंस तू.


किड्या- मुंग्यांसारखी माणसे वाहून गेली,

छोट्या बाळाला उराशी धरून आईही गेली,

अशी कशी रे ही दुर्दशा केलीस तू.


जीवघेण्या पुराने गावे केली उध्वस्त सारी,

कधीतरी न्याय मिळेल का हो आम्हाला सरकार दरबारी.


नसताना काही ध्यानीमनी घास क्षणात निसटला,

खूप काळ जरी लोटला तरी ती रात्र पावसाची स्मरते कधी कधी,

डोळ्याच्या कढा ओलावतात अधी मधी......

-सौ मधुरा गोपाळ देशपांडे, फलटण.





6 comments:

  1. It was really heart touching🥺just pray for the citizens who caught in flood crisis🥺🙏🏻🙏🏻..the structure of word is veryyy nice Ma'am outstanding😊👍🏻❤️

    ReplyDelete
  2. छान आहे कविता

    ReplyDelete

WEBSITE EDITED AND DESIGNED BY RAM DESHPANDE