MHT CET REEXAM APPLICATION DATE EXTENDED 🔥🔥
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'एमएचटी सीईटी २०२२' पीसीएम आणि पीसीबी ग्रुपच्या परीक्षेच्या सुरवातीला राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या 'एमएचटी सीईटी २०२२' या परीक्षेदरम्यान सर्व्हर किंवा नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पूर्ण करू न शकलेल्या किंवा परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. या पुर्नपरीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी बुधवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'एमएचटी सीईटी २०२२' पीसीएम आणि पीसीबी ग्रुपच्या परीक्षेच्या सुरवातीला राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी काही विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षेच्या नोंदणीसाठी २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, राज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांकडून दूरध्वनीद्वारे आणि सीईटी सेलच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुर्न परीक्षेकरिता नोंदणी करण्याचा कालावधी वाढवून मिळण्याची विनंती करण्यात आली. त्याची दखल घेत परीक्षा कक्षाने ही मुदतवाढ केली आहे.
तांत्रिक व नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा पूर्ण करू न शकलेले किंवा परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून व त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पुर्नपरीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या मुदतीत बुधवारपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment