SUPERFAST CHARGE होईल तुमचा मोबाईल फोन🔥..फक्त या टीप्स follow करा 👆..
अलीकडच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन आपल्या सोबत असतो. परंतु स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. मोबाइलची बॅटरी संपल्यामुळं आपल्या कामाचा खोळंबा होऊ नये, यासाठी अनेकजण पॉवर बँक सोबत घेऊन फिरत असतात. अलीकडच्या काळात अनेक मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या फोनमध्ये अधिक पॉवर बॅटरी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु या स्मार्टफोनला चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणूनच स्मार्टफोनची बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी काय करावं, याच्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.
टिप्स:
1. फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवा- जेव्हा तुम्ही फोन चार्ज करता तेव्हा तो फ्लाइट मोडमध्ये ठेवा म्हणजेच फ्लाइट मोड चालू करा. याचा फायदा म्हणजे नेटवर्क सर्च करण्यासाठी लागणारी बॅटरी आणि बॅकग्राउंडमध्ये चालणारी अॅप यासाठी खर्च होणारी वाचेल आणि आणि फोन लवकर चार्ज होईल.
2. स्विच ऑफ करून फोन चार्ज करा- स्मार्टफोन बंद करून चार्ज केल्यावर त्याची बॅटरी खराब होते, असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. उलट असं केल्यानं फोन लवकर चार्ज होतो, कारण फोन चालू असल्यावर खर्च होणारी बॅटरी वाचते आणि स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.
3. लॅपटॉपवरून यूएसबी पोर्टद्वारे चार्ज करू नका- अनेकवेळा आपण आरामात लॅपटॉपवरून यूएसबी पोर्टद्वारे मोबाईल चार्ज करतो, परंतु हे चुकीचं आहे. वास्तविक, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून यूएसबीद्वारे फोनचा चार्जिंग वेग खूपच कमी होतो. त्यामुळे मोबाईलसोबत दिल्या गेलेल्या अडाप्टरनेच फोन चार्ज करा.
4. कंपनीचा ओरिजनल चार्जर वापरा- अनेक वेळा आपण एखाद्या मित्राच्या ठिकाणी किंवा घरी जाऊन दुसऱ्या मोबाईलच्या चार्जरने फोन चार्ज करतो, तो योग्य मार्ग नाही. यामुळे फोनची बॅटरीही खराब होते.

No comments:
Post a Comment